Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ कोसळला. यावरून राज्यात सरकारविरोधात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर खोचक ट्विट केले आहे. दरम्यान केंद्र सरकारने देखील राज्य सरकारला हा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळण्याचा सल्ला दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी "45 किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने कोकणातील नारळाच्या झाडावरून नारळही पडत नाहीत, पण भ्रष्टाचार मात्र उघडा पडला..!" असे खोचक ट्विट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजगड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळला कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार आणि भाजपच्या (BJP) भ्रष्ट कारभारावर समाज माध्यमांवर मीम्स व्हायरल होत आहेत.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेते या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन होत आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राजगडावर पोचले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन सुरू असताना भाजप नेते नारायण राणे, नीलेश राणे आणि त्यांचे समर्थक तिथे पोचले. ठाकरे-राणे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यावर शिवसेनेचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी काही वाईटं घडलं, तर पुढे चांगलं होण्यासाठी घडेल, असे विधान केले होते. दीपक केसरकर यांच्या या विधानावर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले असून त्यांच्या विधानाचा राज्यभर निषेध होत आहे. याच विधानावरून विरोधकांनी, विशेष करून महाविकास आघाडीने महायुतीला चांगलेच टार्गेट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.