Param Bir Singh
Param Bir Singh sarkarnama
महाराष्ट्र

बदली केल्यानेच परमबीर सिंहांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) व निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यासह अन्य दोन जणांवर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल (Chargesheet ) करण्यात आले आहे. दंडाधिकारी एस.बी.भाजीपाले यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सुमित सिंह, अल्पेश पटेल या दोन जणांवरही याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे दोघे फरारी असल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे. खंडणीप्रकरणात परमबीर सिंह यांच्यासाठी सचिन वाझे हा पैसे वसुल करीत असल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे. सचिन वाझे यांच्या जबाबानुसार वसुलीची ७५ टक्के रक्कम परमबीर सिंह यांना दिली जात होती, तर उर्वरीत रक्कम वाझे स्वतःकडे ठेवत असे.

गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police) परमबीर सिंह व अन्य तीन जणांच्या विरोधात चारशे पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल धालेला पहिला गुन्हा आहे. त्यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यांना काही दिवसापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. सुमित सिंह व अल्पेश पटेल ह सध्या जामिनावर असून विनायक सिंह आणि रियाज भट्टी हे फरारी आहेत.

तीन-चार साक्षीदारांच्या जबाबनुसार वाझे हा परमबीर सिंह यांचा उल्लेख नंबर वन म्हणून करीत असे. ''नंबर एकने पैसे मागितले आहे,' असे वाझे म्हणत होता, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

हाय प्रोफाइल प्रकरणाची चैाकशी करण्यास परमबीर यांनी वाझेला सांगितले होते. वाझे हॅाटेल चालक, बार मालकांकडून पैसे वसुल करीत होता. पैसे न दिल्यास त्यांना अटक करण्याची व बदनाम करण्याची धमकी देत असे.

राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र सादर

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात परमबीर यानी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर यांनी विशेष रजेसाठी आणि संरक्षणासाठी जी याचिका केली आहे ती फेटाळून लावावी, असे प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे.

''परमबीर सिंग आणि संजय पांडे यांच्यात जे संभाषण झालं ते काय झालं याची कल्पना राज्य सरकारला नाही. परमबीर यांनी जे आरोप केले त्यादर्भातले कोणतेही पुरावे किंवा अधिकची माहिती देण्यात ते अपयशी ठरले आहे. बदली केल्यानंतरच त्यांनी पत्र लिहून आरोप केले आहे. बदलीमुळेच त्यांनी हे आरोप केले आहे,'' असे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने परमबीर सिंह आणि पराग मणेरे यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. महाराष्ट्र सरकारने मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती समितीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील विभागीय चौकशीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली. परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश शुक्रवार ३ डिसेंबर रोजी स्वीकारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT