Farmer Loan Waiver Update Sarkarnama
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट; खात्यात जमा होण्यास विलंब, कृषीमंत्र्यांनी सांगितलं कारण (Video)

Loan waiver funds to be credited after Assembly session approvals : राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे.

Pradeep Pendhare

Ahilyadevi Holkar Loan Waiver : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर जमा केली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, पुरवणी अर्थसंकल्पातील मागण्यांना विधानसभेची मंजुरी आणि त्यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी मिळाल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट निधी हस्तांतरित केला जाईल.

दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले की, कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी सुरुवातीला 30 जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ती 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि प्रक्रियेत त्रुटी राहू नयेत, यासाठी सखोल पडताळणीला प्राधान्य दिले जात आहे.

त्यामुळे निधी वितरणात काही दिवसांचा विलंब झाला तरी चालेल; मात्र सर्व माहितीची खातरजमा झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज आहे.

या योजनेत पीककर्जावरील 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचीही तरतूद करण्यात आली आहे.

अधिवेशनानंतर निधी वितरणाची प्रक्रिया

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, अधिवेशनातील आर्थिक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच आणि आवश्यक प्रशासकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यास सुरुवात केली जाईल. सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT