OBC leader Laxman Hake attacked in Ahilyanagar, police explain the sequence of events. Sarkarnama
महाराष्ट्र

Laxman Hake Attacked : नाश्ता होईपर्यंत दबा धरला, बाहेर पडताच गाठलं अन् लक्ष्य केलं... पोलिसांनी सांगितला हाकेंवरील हल्ल्याचा थरार

Laxman Hake Attacked : अहिल्यानगर जिल्ह्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी घटनाक्रम स्पष्ट केला असून, हल्ला कसा झाला याची माहिती दिली आहे.

Hrishikesh Nalagune

Laxman Hake Attack News : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाला. पाथर्डी तालुक्यातील ओबीसी मेळाव्यासाठी जाताना अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. हल्ला होत असतानाच सुरक्षेसाठी सोबत असलेल्या पोलिसांनी हाके यांना सुरक्षित बाहेर काढले. यात आतापर्यंत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी आता हा संपूर्ण हल्ला कसा घडला याबाबत सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणत: 12 वाजता दरम्यान लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात होते. अहिल्यानगर बायपास रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये ते नाष्टा करण्यासाठी थांबले होते. नाश्ता करून परत जात असताना काही इसमांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

काठ्या घेऊन केलेल्या हल्ल्यात हाके यांची गाडी फोडण्यात आली. यावेळी हाके यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलं. हल्लेखोरांपैकी 3 जणांना ताब्यात घेतले आहे. आता नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी फेसबूकवर पोस्ट करत आपले शत्रू वाढत जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांच्यावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या हल्ल्याबाबत बोलताना हाके म्हणाले, 10 ते 12 लोकांनी आमच्यावर हल्ला केला. पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असतानाही हल्लेखोरांनी न घाबरता दोन ते तीन फुटांचे बांबू आणले आणि आमच्या दोन्ही गाड्यांवर बेछुट हल्ला चढवला. दहा सेकंद जरी कमी जास्त झालो असतो तरी बांबू आमच्या डोक्यात पडले असते. माझ्यासोबत आंदोलनात असलेल्या माझ्या सहकाऱ्याचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी हाकेंचे नाव न घेता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ला करून घेतली, असे म्हटले आहे. हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर संताप व्यक्त करताना हा स्टंट वाटतो का? असा सवाल केला. आमच्या आठव्यांदा हल्ला झाला. मराठा समाजाचा नेता म्हणवून घेण्यास या समाजाला लाज वाटत नाही का? असाही जाब विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT