Plane Crash News : अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या एअर इंडियाचे बोईंगच्या ड्रीमलाईनर विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 265 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, या अपघाताबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज ठाकरेंनी आपल्या ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं.'
'जानेवारी 2013 ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे 2013 ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं.
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ?' असा सवास देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
ड्रीमलाईनरची सेवा 2020 ते 2023 च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40 हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला ?
ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आपल्या मताची पुष्ट करण्यासाठी राज यांनी पुरावे म्हणून 'ड्रीमलाईनर'विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये जे छापून आले आहे, त्यांच्या तसेच युट्यूबवरील माहितीपटाची लिंक दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.