Nagar news  Sarkarnama
महाराष्ट्र

BJP News: भाजप महावितरणच्या कार्यालयात 'फटाके फोडणार';"हिंदूंच्या सणातच, असे प्रकार का होतात?

Nagar News : आंदोलन अधिकाऱ्यांना झेपणार नाही," असा इशारा अभय आगरकर यांनी दिला आहे.

Pradeep Pendhare

Nagar: नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अघोषित भारनियमन सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर नगर शहरातील अघोषित भारनियमनावर आक्रमक झाले आहेत. "हिंदूंच्या सणातच, असे प्रकार का होतात. अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा ऐन दिवाळीत भाजप महावितरणच्या नगर कार्यालयांमध्ये फटाके फोड आंदोलन करेल. हे आंदोलन अधिकाऱ्यांना झेपणार नाही," असा इशारा अभय आगरकर यांनी दिला आहे.

दिवाळी सणातच भारनियमन कसे सुरू होते. भारनियमनामुळे बाजारपेठेतील व्यवसायांसह घरगुती कामांवर परिणाम होत आहे. याबाबत अभय आगरकर यांनी महावितरणच्या नगर कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इशारा दिला. दिवाळी सण सुरू आहे. बाजारपेठेत गर्दी होत आहे. आर्थिक उलाढालीचे दिवस असताना हे अघोषित भारनियमन कसे?, असा प्रश्न आगरकर यांनी अधिकाऱ्यांना केला. यावर सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणच्या नगर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले.

आगरकर म्हणाले, "हिंदूंच्या सणावेळीच भारनियमन सुरू होते. हा प्रकार होतोच कसा? वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यावरदेखील अघोषित भारनियमन सुरू झाल्यास महावितरणच्या नगर कार्यालयात आंदोलन करू". हे आंदोलन महावितरणच्या अधिकाऱ्यांना पेलवणार नाही. हे आंदोलन 'फटाके फोड' असेल,"

वीजपुरवठा खंडितच्या तक्रारी वाढल्या

दिवसभरातून तीन ते चार वेळी वीजपुरवठा अवेळी खंडित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार होत आहे. दिवाळीत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला कापड बाजारदेखील तीन दिवसांपूर्वी बरेच काही तास वीजपुरवठा खंडित होता. याशिवाय उपनगरांमध्येदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. नगर शहरालगत असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसातून काही तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT