Lalit Patil Case: दर महिन्याला ललितकडून ससूनला १७ लाख रुपये...; धंगेकर म्हणाले,...

Ravindra Dhangekar on Lalit Patil Case: डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा..
Lalit Patil Case
Lalit Patil CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मॅट कोर्टाचा निर्णय योग्य ठरवत न्यायालयाने संजीव ठाकूर यांची डीन पदावरून हकालपट्टी केली आहे, तर दुसरीकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ललित पाटील प्रकरणातील तपासात रोज नवी माहिती समोर येत आहे. ललित हा ससूनमध्ये राहण्यासाठी तो प्रशासनाला महिन्याला १७ लाख रुपये देत होता, असे तपासात आढळले आहे. "ललित पाटील प्रकरणाचा तपास दोन महिन्यांपासून सुरू आहे. तपासाला ज्या गती येणे गरजेचे होते, तसा तपास होत नाही. ललितने ससून प्रशासनाला दर महिना तब्बल १७ लाख रुपये देत होता, अशी कबुली त्याने दिली आहे. तपासात दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणाला सरकारचे पाठबळ आहे,"असा आरोप धंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

Lalit Patil Case
Sanjay Raut: अजितदादांना राऊतांचा चिमटा; आजारी माणूसच दुसऱ्यांना भेटायला जात आहे...

"पुणे शहरातील पोलिस अधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पाटील याने जे पैसे वाटप केले ते जमा करून घेणे आवश्यक आहे. तसेच संबंधित लोकांना आरोपी करणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.

धंगेकर म्हणाले, "राज्य सरकारने नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल नौटंकी असून, ठाकूर यांना अटक होऊन त्यांची नार्को चाचणी झाली पाहिजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. १० ते १२ जणांना अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे तपास गेलेला नाही. चांगल्या अधिकाऱ्यांकडून हा तपास झाला पाहिजे. राज्य सरकारमधील एक गुन्हेगार सोबत असलेला मंत्री याचे नाव लवकरच समोर येईल. तपास योग्य दिशेने जात नसून डॉ. ठाकूर याला बडतर्फ करणे आवश्यक आहे."

"उच्च न्यायालयाने ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर एका तासातच सरकारने चौकशी समितीचा अहवाल प्रकाशित केला. सरकार डॉ. ठाकूर यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, असे सांगत आहे. परंतु ठाकूर आणि पाटील यांच्यावर मोक्का गुन्हा दाखल होऊन नार्को चाचणी करण्यात यावी," अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

महिनाभरापूर्वी ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल २ कोटी १४ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ड्रग्ज तस्कर ललित पाटील फरार झाला होता. यानंतर ससूनचा वॉर्ड क्रमांक १६ आणि ससूनचे संजीव ठाकूर हे चांगलेच चर्चेत आले होते.

Lalit Patil Case
Sanjay Raut: ठाकरेंना अडवून दाखवा; राऊतांनी पोलिसांसमोर दंड थोपटले, मुंब्रा येथे तणाव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com