Ajit Pawar ON Chief Minister Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी सामजिक न्याय विभागावर अन्याय! एकनाथ शिंदे-अजितदादांमधील अंतर वाढणार?

Ajit Pawar Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा यापूर्वी 410.30 कोटी रुपयांचा निधी वळवला होता. आता पुन्हा 410 कोटीचा निधी वळवला आहे.

Roshan More

Pawar VS Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या विभागाला निधी देत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या विभागाचा निधी लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा तब्बल सामजिक न्या विभागाचा 410 कोटींचा निधी लाडक्या बहि‍णींसाठी वळवण्यात आला आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला जात असल्याची भावना निधी वळवल्याने केला जातो आहे. सामजिक न्याय विभागासोबत आदिवासी विभागाचा निधी देखील वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागाचे मिळून तब्बल एक हजार कोटीचा निधी वळवला आहे. आपल्या मंत्र्याच्या खात्याचा निधी वळवल्याने शिंदे अजित पवारांवर नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामाजिक न्याय विभागाचा यापूर्वी 410.30 कोटी रुपयांचा निधी वळवला होता. आता पुन्हा 410 कोटीचा निधी वळवला आहे. आत्तापर्यंत सामाजिक न्यायविभागाचा 820 कोटी 60 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. हा निधी वळवल्याने सामाजिक न्याय विभागाच्या योजनांना फटका बसत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. सामाजिक न्याय विभागासोबतच आदिवासी विभागाचे लाडक्या बहिण योजनेसाठी तब्हल एक हजार सात कोटी रुपये वळवण्यात आले आहेत.

मे महिन्याचा हफ्ता मिळणार

निधी वळवल्याने लाडकी बहीण योजनेचा हफ्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांचे खाते आधारला लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शासकीय सेवेत असुनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याऱ्या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT