Congress Trouble : राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या तयारीने काँग्रेसची कोंडी, राजकीय गणित बदलणार!

Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election : खासदार वर्षा गायकवाड या मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा आहेत. त्यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Possible Raj-Uddhav alliance may force Congress to rethink civic poll strategy
Possible Raj-Uddhav alliance may force Congress to rethink civic poll strategysarkarnama
Published on
Updated on

MVA Election : विधानसभा निवडणुकीतील अपयशाने मुंबई महापालिका निवडणूक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील तीच अवस्था आहे. त्यामुळे मागील सर्वकाही विसरून मुंबई महापालिकेसाठी उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. युतीसाठी दोन्ही बाजुंनी सावधे पावले टाकण्यास सुरुवात देखील केलीये. या युतीचा फटका जसा भाजपला बसण्याची शक्यता आहे. तशीच ठाकरे बंधू एकत्र आल्याने काँग्रेसची कोंडी होणार आहे.

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत. मात्र, मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची त्यांची चाचपणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मागे हर्षवर्धन सपकाळ हे एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेऊन आले. मनसेची उत्तर भारतीयांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेने जर काँग्रेस उद्धव राज ठाकरेंच्या युतीसोबत केली तर त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक देखील त्याच दरम्यान होईल. त्यामुळे मनसेची उत्तर भारतीयांच्या विषयी असलेल्या भूमिकेचा फटका थेट काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेसची काही नेते खासगीमध्ये घेत आहेत.

Possible Raj-Uddhav alliance may force Congress to rethink civic poll strategy
Shivsena UBT Politics: राज, उद्धव एकत्र यावेत यासाठी नाशिकमध्ये मनसे, शिवसेना समर्थकांनी फुंकली तुतारी!

काँग्रेसकडून स्वबळाची तयारी?

उद्धव ठाकरेसोबत असल्याने मुंबई महापालिकेत काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांना होती.मात्र, ते मनसेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार की नाही याची शंका निर्माण होते आहे. मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीमध्ये आपल्याला किती जागा येतील याची शंका काँग्रेसला आहे. त्यामुळे स्वबळावर लढून पक्ष मजबूत करण्याची तयारी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.

वर्षा गायकवाडांना अधिकार...

खासदार वर्षा गायकवाड या मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा आहेत. त्यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गायकवाड यांच्या नेतृत्वाला काही जणांचा विरोध आहे.मात्र, काँग्रेस वरिष्ठांना वर्षा गायकवाड यांच्यावर विश्वास व्यक्त करत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांना कायम ठेवत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

Possible Raj-Uddhav alliance may force Congress to rethink civic poll strategy
Bengaluru Stampede : बेंगळुरुमधील चेंगराचेंगरीची कुंभमेळ्यातील 'त्या' घटनेशी तुलना, कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलून बसले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com