Rohit Pawar Ajit pawar accident narendra modi amit shah (1).jpg Sarkarnama
महाराष्ट्र

DGCA Action VSR: अजितदादांच्या विमान अपघातानंतर पहिलीच कारवाई; 'डीजीसीए'ची VSR कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी

Ajit Pawar Airplane Crash : अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर व्हिएसआर कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर डीजीसीएनं या आरोपांची गंभीर दखल घेत आता व्हिएसआर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी डीजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल लवकरात लवकर मिळावा आणि संबंधित VSR विमान कंपनीवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उचलून धरली होती. अखेर डीजीसीए कडून VSR विमान कंपनीवर मोठी कारवाई केली आहे.

अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर व्हिएसआर कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर डीजीसीएनं या आरोपांची गंभीर दखल घेत आता व्हिएसआर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. यात डीजीसीएनं व्हिएसआर विमान कंपनीवर नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणावर बंदी घातली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद आणि व्हिडिओ सादरीकरणासह काही गंभीर सवाल उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी काही संशयाच्या आधारे हा अजित पवार (Ajit Pawar) यांचा घातच झाला असल्याचाही दावा केला होता. त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत खासगी गुप्तहेरांमार्फत भेट घेत डीसीजीएच्या अहवाल लवकरात लवकर मिळण्यासाठी मोठी पावलं उचलल्याचंही समोर आलं होतं.

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण बारामती दुर्घटना प्रकरणातील विमानाच्या हवाई प्रवास क्षमता आणि उड्डाण योग्यतेबाबतचाही तपास होणार असल्याची माहिती समोर आली होती. आहे. तसेच विमान कंपनीच्या कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार असल्याचं पुढे आलं होतं. यामुळे रोहित पवारांच्या दबावानंतर आता सरकार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी दिल्ली गाठत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यात दुर्घटनेसंबंधीचा अहवाल येण्यास विलंब लागण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणाचा अहवाल तातडीनं मिळण्यासाठी रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याचं समोर आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT