Ajit Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Vs Chhagan Bhujbal : एकाच मागणीसाठी अजितदादा-छगन भुजबळांमध्ये चढाओढ; केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र

Ajit Pawar Chhagan Bhujbal piyush goyal : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.

Roshan More

Ajit Pawar Vs Chhagan Bhujbal : लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा निर्याद प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात चढाओढ पाहण्यास मिळत आहेत. अजितदादांनी पत्र लिहिल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले त्यामुळे भुजबळ यांची मंत्रि‍पदाची नाराजी पुन्हा एकदा प्रकट झाल्याची चर्चा आहे.

'लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे', असे भुजबळ यांनी ट्विटरवरून दिली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.

राज्यातील आमदार नितीन अर्जुन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोजताई अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालण्याची तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी अडचणीत

कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीतया आहे. आधीच बिगरमोसमी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे त्रस्त असताना आता उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ विक्री करावी लागते, हेही नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे असून राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे, असे भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT