Vijay Wadettiwar News : भाजप कार्यकर्ते नव्हे तर गुंड म्हणत विजय वडेट्टीवारांची टीका

Mumbai Congress : मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयाची तोडफोड केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी किल्ला कोर्टासमोर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी काँग्रेसच्या कार्यालयासमोर मोठा राडा झाला. मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याने राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडले. यामध्ये कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी लाठीमार केला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर सडकून टीका केली. (Vijay Wadettiwar News)

मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या (Congress) कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयाची तोडफोड केली. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या बॅनरवर शाई फेकली. भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणारे कार्यकर्ते नसून ते पोसलेले गुंड होते, असे म्हणत टीका केली.

Vijay Wadettiwar
Chhagan Bhujbal : 'तिकडे' काय चालले आहे, हे छगन भुजबळांना अडीच वर्षांनंतर कळाले!

दरम्यान, मुंबईत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचरचे नुकसान झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्याकडून घडलेल्या या प्रकारानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Vijay Wadettiwar
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या पुनर्वसनासाठी नवा प्लॅन तयार; राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारणार का ?

राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar: 'गिरीश आता तरी सुधार..'; असे सभागृहात अजित पवार का म्हणाले ?

आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानच्या निषेधार्थ काँग्रेसकडून अमित शहा आणि भाजप विरोधात आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दिल्लीतही राहुल गांधी आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे वातावरण तापले असतानाच मुंबईत हा प्रकार घडला. यावरून राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

Vijay Wadettiwar
BJP vs Congress Rada : मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा; काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com