Ajit PawarLatest News Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांनी डेंग्यू आजारपणाबाबत दिले अपडेट; म्हणाले ''पूर्णपणे बरं होण्यास...''

Mayur Ratnaparkhe

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही दिवसांपासून डेंग्यू झाल्यामुळे आजारी आहेत. परिणामी ते कोणत्याही शासकीय अथवा खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहू शकलेले नाहीत. राज्यात मागील काही दिवसांत मराठा आरक्षणावरून घडलेल्या घडामोडींच्या काळात सरकार पातळीवर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकांमध्येही ते गैरहजर दिसले. त्यांच्या अनुपस्थितीवरून उलटसुलट चर्चाही झाल्या. अखेर आज अजित पवारांनी स्वत: ट्विटद्वारे आजारपणाबाबत माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ''गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.''

याचबरोबर ''डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर राहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही,'' असंही अजित पवारांनी सांगितलं.

याशिवाय ''परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबीयांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो,'' असं म्हणत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT