Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजितदादांनी काठावर असलेल्या आमदारांना भरला सज्जड दम; म्हणाले, 'तर नव्यांना संधी देता येईल...'

Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना परखड मत व्यक्त करीत काठावर असलेल्या आमदारावर निशाणा साधला.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महायुती बॅकफुटवर आली आहे. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व जागी विजय मिळवता आल्याने कॉन्फिडन्स वाढलेला दिसत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना परखड मत व्यक्त करीत काठावर असलेल्या आमदारावर निशाणा साधला.

आमदार पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर सोमवारी बोलताना काही आमदार पक्ष सोडून परत गेले तरी हरकत नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. ते गेले तर नव्या मंडळीना संधी देता येईल, असे विधान केले. (Ajit Pawar News)

लोकसभा निवडणुकीनंतर झाले गेले विसरून आता आगामी काळात होते असलेल्या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्र्रवादी काँग्रेस (Ncp) अजितदादा गट येत्या काळात विधानसभेच्या 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. जेणेकरून पक्षाची ताकद कळणार असून त्यानुसार उमेदवार देता येणार असल्याचे पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवार यांनी सांगितले.

आगामी विधनसभा निवडणुकीत 54 पेक्षा अधिक जागांवर आमचा दावा असणार आहे. विधान परिषद निवडणुकीत अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे काहीसे चैतन्य अजित पवार गटात पसरले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत याचा झाला फायदा

विधानपरिषद निवडणुकीत आम्ही कोणतीच आमदारांना प्रलोभनं दिली नाहीत. अनेक आमदारांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी मला मतदान केले, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तुमच्यावर माझं लक्ष असेल, एवढंच आमदारांना म्हणालो, त्याचा या निवडणुकीत मला फायदा झाला असल्याचे यावेळी अजितदादा यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT