महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार गटाने अमित शाहांना भेटून केल्या 'या' महत्त्वपूर्ण मागण्या!

Ajit Pawar meet Amit Shah : जाणून घ्या, नेमकी कशासंदर्भात चर्चा झाली आणि काय मागण्या केल्या आहेत.

Mayur Ratnaparkhe


Ajit Pawar group news :
दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अजित पवार हे डेंग्यूमुळे मागील काही दिवसांमध्ये आजारी होते आणि डॉक्टारांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला होता. मात्र, त्यानंतरही ते अचानक दिल्लाला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. शिवाय यावर विविध प्रतिक्रियाही उमटल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

दरम्यान, अजित पवार गटाने अमित शाहा यांची नेमकी कशासाठी भेट घेतली आणि काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आता यासंदर्भात काही माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाने अमित शाहांकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात सत्तावाटप योग्य प्रकारे झाले, तरच निवडणुकीत यश मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 'एनडीए'ला निवडणुकीत यश अपेक्षित असेल, तर लवकर कामाला लागणे गरजेचे आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाह यांना सांगितल्याचे समजते.


याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा, असाही अजित पवार गटाचा सुरुवातीपासूनच आग्रह आहे. तसेच महामंडळाबाबत नेमणुकांचा विषय मार्गी लावला जावा, अशी विनंतीही करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याचबरोबर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज नाराज होत असल्याने, आगामी निवडणुका पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. तरी ओबीसी समाजाकडे लक्ष दिले जावे, अशीही मागणी अमित शाहांकडे केली गेल्याचे समजते.

(Edited by - mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT