MLA Rohit Pawar : रोहित पवारांनी फोडला नवा राजकीय बॉम्ब; 'कर्जत-जामखेड'मध्ये...'

Karjat Jamkhed : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य करत मोठा बॉम्ब फोडला आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

Ahmednagar News: सध्या दीपावलीची धूम सर्वत्र सुरू असून यात फटाके फोडण्याचा आनंद घेण्याचा प्रघात आहे. यात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राजकीय लोकप्रतिनिधी आपल्या परीने राजकीय बॉम्ब फोडत विरोधकांना कानठळ्या बसवत आहेत. मात्र, या राजकीय आरोपांच्या फटाके फोडाफोडीत एक राजकीय संघर्षही डोळ्यात भरणारा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही एक वक्तव्य करत मोठा बॉम्ब फोडला आहे.

2019 पूर्वीच काही वर्षे उद्योजक म्हणून परिचित असलेले आणि शरद पवार यांचे नातू अशी ओळख असलेले रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एक उद्दिष्ट घेऊन दखल झाले होते. दोन तालुके मिळून बनलेल्या या मतदारसंघातील प्रलंबित नागरी प्रश्नांवर त्यांनी 'फोकस' करत विविध कामांना हात घालतानाच युवा वर्गाला साद घातली. कर्जत-जामखेडच्या जनतेनेही त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Rohit Pawar
Rohit Pawar : 'पवार'जे बोलतात तेच करतात; रोहित म्हणाले, 'यंदाची दिवाळी बारामतीत नव्हे तर...

कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना आणि सलग दोन वेळेस आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेले राम शिंदे यांचा रोहित पवारांनी पराभव करत मोठा धक्का दिला. यातूनच नंतर विधानपरिषदेवर नियुक्त झालेले राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात मोठा राजकीय संघर्ष वेळोवेळी आतापर्यंय पाहावयास मिळत आहे.

मविआ सरकार कोसळल्यानंतर आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम राम शिंदे करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी सातत्याने केला. यातून दोघांनी अनेकदा एकमेकांवर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले.

मतदातसंघात येणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी नेहमीच संघर्षाचे केंद्रस्थान राहिले. याचे दोन कारणे असून चौंडी हे राम शिंदे यांचे मूळ वास्तव्याचे गाव असून ते अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत आणि चौंडीचा विकास कोणी केला यावर होत असलेले दावे-प्रतिदावे हे आहे.

MLA Rohit Pawar
Balasaheb Thorat : ''महापालिकांवर प्रशासक म्हणजे, अनागोंदी अन् भ्रष्ट कारभारास मोकळीक'' ; बाळासाहेब थोरातांचे विधान!

आता रोहित पवार यांनी दीपावली निमित्ताने दिवाळी फराळ कार्यक्रमात चौंडीचा जोही विकास झाला तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा तसेच 2019 ला मविआ काळात मंजूर केलेल्या कामातून झाल्याचा दावा केला आहे.

त्याच बरोबर चौंडीतील कोट्यवधी तरतूद असलेल्या घाट विकासाच्या कामांना राम शिंदे यांच्यामुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप केला. ही स्थगिती आम्ही न्यायालयातून उठवून काम सुरू केले असून या कामांचा शुभारंभ येत्या 16 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर केले.

चौंडीसाठी एक रुपयांचा निधी न आणणारे 'महाशय' केवळ विकास कामांना स्थगिती आणण्याचे काम करत आलेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला. मात्र, असे असले तरी तुम्ही कितीही अडथळे आणा, लोकं आमच्या सोबत आहेत, आम्ही काहीही करू, न्यायालयातून न्याय मिळवू, पण कामे करूच कारण आम्ही 'कर्जत-जामखेड'चे 'सरकार' असल्याचे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

Edited by : Ganesh Thombare

MLA Rohit Pawar
Solapur Politics: राम सातपुतेंचे अकलूजचे दौरे वाढले; मोहिते पाटलांशी तडजोडीचे प्रयत्न ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com