Narendra Patil, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार, भुजबळांनी मराठा पोर्टल बंद पाडले : समाजाचे नुकसान, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षांचा आरोप

Narendra Patil Allegations on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबधित जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. अशातच आता त्यांच्या विरोधात अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप करून या अडचणीत भर टाकली आहे.

Sampat Devgire

Nashik News, 08 Nov : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबधित जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. अशातच अजित पवार यांनी मराठा पोर्टल बंद करायला सांगितले, त्यांच्याकडे निधी मागायला गेल्यावर ते चिडचिड करतात, असा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. या आरोपांमुळे अजित पवार यांच्या विरोधात रोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी त्यांनी मराठा समाजाच्या बेरोजगार युवकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी त्यांनी मागील महिन्याभरापासून बंद असलेल्या वेबसाईटवर भाष्य केले.

नरेंद्र पाटील म्हणाले, मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट बंद पाडली. गेले महिनाभर संकेतस्थळ बंद असल्याने मराठा समाजाच्या युवकांची कोंडी झाली. हजारो युवक ऐन दिवाळीत नोकरी, व्यवसायासाठीच्या कर्जापासून वंचित राहिले, असे गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संदेश पाठविला आहे, असेही त्यांनी सांगितले.

अण्णासाहेब महामंडळाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढ्यावरच न थांबता नरेंद्र पाटील म्हणाले, मी कोणतेही प्रश्न घेऊन अजित पवारांकडे गेलो की त्यांना वाटते मला निधी हवा आहे. ते माझ्यावर सतत चिडचिड करतात.

महिनाभर पोर्टल बंद राहिल्याने 15 हजार मराठा समाजाच्या युवकांचे नुकसान झाले, युवकांना नोंदणी, कागद पत्रांची पूर्तता आणि आपले प्रकल्प अहवाल अपलोड करता येत नाहीत. महामंडळाला कर्ज घेतलेल्या युवकांच्या व्याजाचे अनुदान देता येत नाही. एकट्या नाशिक जिल्ह्यात दहा ते बारा हजार मराठा समाजाच्या युवकांची त्यामुळे कोंडी झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षांनीच उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर हा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT