Ajit Pawar last memory, Ajit Pawar Baramati video: ज्येष्ठ नेते अजित पवारांच्या अकाली निधनानंतर समाज माध्यमातून नेटकऱ्यांनी याबाबत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. बारामतीतील विमान अपघात झालेल्या ठिकाणाहून एका महिलेने काढलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नेटकरी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. या व्हिडीओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला आहे.
बारामती विमानतळाजवळ अपघातग्रस्त विमानाचा सांगाडा पडला आहे. जळून खाक पडलेल्या अनेक वस्तू अस्ताव्यस्त दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांचे मन हेलावले आहे. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. बारामतीच्या सून असलेल्या कल्याणी पारखे नरुटे नावाच्या एका तरुणीने येथील व्हिडिओ काढला आहे. तो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
कल्याणी या मुळच्या नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. बारामती हे त्यांचे सासर आहे. कल्याणी यांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये अजितदादांची शेवटची आठवण म्हणून एक जळलेला कागद उडत आल्याचं दिसत आहे. अपघातातला एक जळालेला कागद उडत उडत धावपट्टीपर्यंत आल्याचं दिसत आहे. त्यावर विमानाच्या चेकींगबद्दल माहिती लिहिली आहे. विमानाच्या को-पायलट शांभवी पाठक यांची सही देखील त्यावर दिसत आहे. अजूनही विश्वास बसत नाही, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिली आहे.
कल्याणीने शेअर केलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. "हीच ती जागा जिथे दादा सोडून गेले... दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली आणि मन एकदम गहिवरून आलं. एवढं सर्व दिसतंय, तरी विश्वास बसत नाहीये, की दादा आता आपल्यात नाही राहिले..." असे त्यात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.