Dhanjay Munde, Sanjay Kute  Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Kute News : अजितदादांच्या नेत्यानं फडणवीसांच्या विश्वासू सहकाऱ्याला मंत्रिपदावरून डिवचलं

Maharashtra Assembly Monsoon Session : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपचे आमदार संजय कुटे यांना विधिमंडळ आवारात मंत्रिपदावरून डिवचले. संजय कुटे यांनी देखील तेवढ्याच ताकदीने मंत्री मुंडे यांना उत्तर दिले.

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास मंत्र्यांनं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू आमदाराला विधिमंडळ परिसरात मंत्रिपदावरून डिवचले. अजित पवार गटाचे नेते कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे ओबीसी नेते आमदार डॉ. संजय कुटे यांना मंत्रिपदावरून मारलेली कोपरखळी चर्चेत आली. मुंडे यांनी डिवचल्यानंतर कुटे त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी हजरजबाबीने 'पुन्हा मंत्री होणार, नक्कीच होणार', असे उत्तर दिले.

मंत्री मुंडे आणि आमदार कुटे दोघे विधिमंडळ इमारतीच्या आवारात आपल्या मित्र परिवारासोबत उभे होते. मुंडे यांनी आमदार कुटे (Sanjay Kute) यांच्याकडे येत खांद्यावर हात ठेवत दंड थोपाटला. काहीसे नाक मुरडले. काय आहे हे ? असे म्हणत, 'मिळेल नक्की मिळेल मंत्रीपद', अशी कोपरखळी मारली. त्यानंतर मुंडे यांनी तेथून काढता पाय घेतला. याच वेळी आमदार कुटे आणि त्यांच्या मित्र परिवाराने 'पुन्हा मंत्री होणार, नक्की मंत्रिपद मिळणार' असे उत्तर दिले. (Sanjay Kute News)

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नेहमी चर्चा होत असते. पावसाळी अधिवेशनापूर्वी देखील ही चर्चा रंगली होती. आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा आहे. यावरून सत्तेत असलेले महायुतीमधील भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट यांच्या आमदारांमध्ये मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये कोपरखळ्या लगावल्या जातात. अशीच कोपरखळी मंत्री मुंडे यांनी भाजप आमदार संजय कुटे यांना लगावली. यामुळे भाजप आमदार संजय कुटे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजप (Bjp) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्के शिलेदार म्हणून आमदार संजय कुटे यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आमदारांसह सुरतला गेले होते. तिथे सुरतमधील ले-मेरिडियन हॉटेलमध्ये शिवसेनेचे सर्व आमदार थांबले होते. तिथे भाजप आमदार डॉ. संजय कुटे पोचले होते. शिवसेनेच्या बंडा पाठीमागे भाजप असल्याची चर्चेच्या शक्यतेला यामुळे बळ मिळाले होते.

संजय कुटे हे भाजपमधील ओबेसी नेते आहेत. ते कुणबी समाजातून येतात. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. बुलडाण्याचे पालकमंत्री होते. फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. मंत्री मुंडे हे देखील ओबीसी आहेत. यातच त्यांनी कुटे या ओबीसी नेत्याला मंत्रिपदावरून डिवचले आहे. आमदार कुटे हे मंत्री मुंडे यांच्या या कोपरखळीची भरपाई कोठे भरून काढतात हे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT