Bjp News : मोठी बातमी : भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, फुकेंना उमेदवारी

Political News : विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत.
Pankja munde, Amit gorkhe, Parinay fuke, yogesh tilekar, Sadabhu khot
Pankja munde, yogesh tilekar, sadabhu khot, amit gorkhesarkarnama

Mumbai News : विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहेत.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा भाजपकडून सोमवारी दुपारी करण्यात आली. (Bjp News)

भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या महादेव जानकर यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अमित गोरखे, निलय नाईक, योगेश टिळेकर, माधवीताई नाईक या नावांची चर्चा होती.

त्यापैकी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. 12 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दिल्लीत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित काही नावे निश्चित करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली होती.

Pankja munde, Amit gorkhe, Parinay fuke, yogesh tilekar, Sadabhu khot
CM Eknath Shinde : 'मदतीचा हात एकनाथ' या फलकातून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा पुन्हा एकदा खोटारडेपणा; आदित्य ठाकरे कडाडले !

विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहेत. भाजपकडे येणाऱ्या पाच जागांसाठी 35 जणांनी उमेदवारी भाजपकडे मागितली होती.

भाजपकडून (Bjp) माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde), हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अमित गोरखे, निलय नाईक, योगेश टिळेकर, माधवीताई नाईक या दहा नावांची चर्चा होती. या पैकी पाच नावे फायनल करण्यात आली.

Pankja munde, Amit gorkhe, Parinay fuke, yogesh tilekar, Sadabhu khot
Bansuri Swaraj Speech : सुषमा स्वराज यांच्या स्टाईलमध्ये दमदार भाषण करत बांसुरी विरोधकांवर बरसल्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com