ajit pawar babajani durrani sharad pawar.jpg sarkarnama
महाराष्ट्र

Babajani Durrani : बाबाजानी दुर्राणींनी 'तुतारी' हाती घेताच अजितदादांच्या पक्षाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना...

Babajani Durrani Join Ncp Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवासाहेबांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला.

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार यांचं 'घड्याळ' सोडून 'तुतारी' हाती घेत पुन्हा घरवापसी केली आहे. विधान परिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्यानं बाबाजानी दुर्राणी नाराज असल्याचं बोललं जात होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवासाहेबांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी ( Babajani Durrani ) यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला. या प्रवेशावर अजितदादांच्या पक्षातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

"आमच्याकडून बाबाजानी दुर्राणी यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यांना आपली प्रगती करण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपली प्रगती करावी," असं विधान प्रफुल्ल पटेल ( Prafull Patel ) यांनी केलं आहे. ते भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, "विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लोक इकडे तिकडे जात असतात. बाबाजानी दुर्राणी यांना विधान परिषदेची जागा पुन्हा पाहिजे होती. पण, आम्ही दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमच्याकडून दुर्राणी यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यांना आपली प्रगती करण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपली प्रगती करावी."

"पवारसाहेबांना सोडल्याची मला खंत"

पक्षप्रवेशानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी सत्तापरिवर्तन होणार असल्याचं विधान केलं आहे. "10 वर्षांत देशात जातीवाद पसरला आहे. शरद पवारसाहेबांकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. पवारसाहेबांना मी का सोडले? याची खंत वाटते. पण, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो, तरी आतून पवारसाहेबांसोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली," असं दुर्राणी यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी अजितदादांना साथ दिली. ते विधान परिषदेवर आमदार होते. आज ( 27 जुलै ) त्यांच्या आमदारकीची मुदत संपत आहे. मात्र, अजितदादांनी त्यांना पुन्हा संधी न देता परभणी जिल्ह्यातीलच राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली. लोकसभेला विटेकरांनी अजितदादांच्या शब्दाखातर महादेव जानकर यांना जागा सोडली. त्याचे 'रिटर्न गिफ्ट' म्हणून अजितदादांना विटेकरांना आमदार केले. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी नाराज झाले होते. अखेर दुर्राणी राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) प्रवेश करत घरवापसी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT