EX MLA Babajani Durani : शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्याला माफ केले ; दहा महिने, आठ दिवसात बाबाजानींची घरवापसी..

Babajani Re-join NCP SP : वाईट काळात पक्ष सोडून गेलेल्या लोकाना पक्षात पुन्हा प्रवेश देताना त्यांनी दिलेल्या यातना लक्षात ठेवल्या जातील, असा कठोर इशारा देणाऱ्या शरद पवार यांनी या आपल्या जुन्या सहकाऱ्याला मात्र मनाचा मोठेपणा दाखवत माफ केले.
Ex. MLA Babjani Durani Join NCP-SP
Ex. MLA Babjani Durani Join NCP-SPSarkarnama
Published on
Updated on

Parbhani NCP (SP) News : वर्षानुवर्षे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या पण राजकीय अपरिहार्यतेमुळे पक्ष फुटीनंतर अजित पवारांसोबत जावे लागलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी झाली आहे. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांनी बाबाजानी यांच्याऐवजी राजेश विटेकर या तरुण चेहऱ्याला संधी दिली.

बाबाजानी यांनी आता जिल्ह्यात मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, असा संदेशच अजित पवारांनी त्यांना दिल्याची चर्चा यानंतर सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. पुर्वीपासूनच अजित पवार आणि दुर्राणी यांच्यात फारसे चांगले संबंध नव्हते. वर्षभरापुर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत बंड झाले तेव्हा बाबाजानी यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

विधान परिषदेचे आठ-दहा महिने शिल्लक राहिल्यामुळे आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात आपला मुलगा जुनेद याची राजकीय घडी बसवण्यासाठी मोठ्या साहेबांच्या छत्रछायेखालीच बाबाजानी यांना अधिक सुरक्षित वाटले. पण राज्याच्या सत्तेत अजित पवारांची एन्ट्री झाली आणि दुराणी यांचे राजकीय गणित बिघडले. पाथरी तालुक्यातील राजकीय वर्चस्वालाच हादरे बसू लागल्याने नाईलाजाने बाबाजानी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला.

Ex. MLA Babjani Durani Join NCP-SP
Sharad Pawar : पंतप्रधानांचं 'ते' विधान अन् पवारसाहेबांची तुफान फटकेबाजी; कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला

या निर्णयाचा त्यांना किती फायदा झाला? या पेक्षा शरद पवारांमुळे मिळालेली विधान परिषदेवर जाण्याची संधी अजित पवारांनी मात्र त्यांना पुन्हा मिळू दिली नाही. एकीकडे अजित पवार यांच्याकडून मानसिक खच्चीकरण, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने पाथरीत सईद खान यांच्या मार्फत उभे केलेले आव्हान अशा दोन्ही बाजूंनी बाबाजानी (Babajani Durani) यांची कोंडी सुरू झाली.

ही कोंडी फोडायची असले तर पुन्हा घरवापसी आणि शरद पवारांच्या नेतृत्वात गेल्याशिवाय पर्यायल नाही, हे दुर्राणी यांनी ओळखले. दहा महिने अन् आठ दिवसातच बाबाजानी दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांची भेट घेत घरवापसीची इच्छा व्यक्त केली.

Ex. MLA Babjani Durani Join NCP-SP
Babajani Durrani : बाबाजानी दुर्राणी यांचा राजकीय प्रवास कसा?

वाईट काळात पक्ष सोडून गेलेल्या लोकाना पक्षात पुन्हा प्रवेश देताना त्यांनी दिलेल्या यातना लक्षात ठेवल्या जातील, असा कठोर इशारा देणाऱ्या शरद पवार यांनी या आपल्या जुन्या सहकाऱ्याला मात्र मनाचा मोठेपणा दाखवत माफ केले. बाबाजानी यांना पुन्हा पक्षात प्रवेश देत पाथरी व परभणी जिल्ह्यात पुन्हा अजित पवार गटाला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबाजीनी दुर्राणी ओळखले जातात. घरवापसीनंतर शरद पवार आता त्यांना अधिक बळ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार गटाने बाबाजानी यांना विधान परिषदेवर संधी नाकारली असली तर शरद पवार त्यांना थेट विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com