Ajit Pawar, Prafull Patel, Sunil Tatkare Sarkarnama
महाराष्ट्र

Ncp News : महाराष्ट्रातील विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद, एकनाथ शिंदें मंत्रिमंडळात?

Ajit Pawar NCP Union Ministry : लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या होत्या.राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद मिळाले नव्हते.

Roshan More

Ncp News : महायुतीमधी नेत्यांची आज (गुरुवारी) रात्री 9 वाजता बैठक होत आहे. या बैठकीला अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शाह उपस्थित असणार आहेत. या बैठकीत सत्तावाटपाचे सुत्र निश्चित केले जाईल. राज्यात मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

महायुतीने मिळवलेल्या या विजयाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना केंद्रात देखील होणार आहे. दोन्ही पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला केंद्रात एक मंत्रिपद मिळाले. मात्र, राष्ट्रवादीला कोणतेही मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल पटेल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे?

एकनाथ शिंदे Eknath Shinde हे उपमुख्यमंत्रिपद घेणार की नाही याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदेंकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षातील दुसऱ्याच नेत्याचे नाव सुचवले जाईल आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होतील, अशा चर्चा होत्या. मात्र, आता एकनाथ शिंदे हे राज्यातच राहणार असून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच

मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे BJP असणार आहे. त्यामुळे महत्त्वाची खाते आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणार आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आग्रही राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT