Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Budget : अजितदादांच्या निधनामुळे अर्थसंकल्प मांडणार 'हा' नेता; अर्थ खात्याबाबत होणार मोठा निर्णय

Ajit Pawar Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानंतर अर्थसंकल्प कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

Roshan More

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमधील विमान दुर्घटनेमध्ये निधन झाले. अजितदादांकडे अर्थमंत्रिपदाचा कार्यभार होता. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामध्ये हा अर्थसंकल्प कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाले आहे.

अजित पवारांच्या पश्चात अर्थमंत्रीपद कोणाकडे जाणार,राष्ट्रवादीमधील वरिष्ठ मंत्र्याला ते मिळणार का? असा चर्चा सुरू असताना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस मांडण्याची शक्यता आहे.

अजित पवारांकडील अर्थ व नियोजन खाते तूर्तासा मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्याकडे जाणार अथवा वेगळा निर्णय घ्यायचा का यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा...

अजित पवारांच्या निधानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यात उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत, असे मत मांडले. माजी मंत्री नवाब मलिक यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या पाहिजेत, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT