Ajit Pawar Death : राष्ट्रवादी काँग्रेस ZP आणि पंचायत समितीचा प्रचार करणार नाही..., अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचा मोठा निर्णय

NCP Stops Election Campaign : अजित पवारांच्या निधनानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाहीत. तर केवळ मतदारांना पत्रके वाटून प्रचार करणार आहे.
Due to NCP leader Ajit Pawar death party has taken decision that they will not do ZP election promotional campaigns
Due to NCP leader Ajit Pawar death party has taken decision that they will not do ZP election promotional campaigns Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 30 Jan : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं बुधवारी (ता.२८) विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर काल बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दु:खाचं वातावरण आहे.

शिवाय पक्ष पोरका झाल्याची भावना देखील अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे अजित पवारांचं निधन (Ajit Pawar Death) झालं तर अवघ्या काही दिवसांवर  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या निधनानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाहीत. तर केवळ मतदारांना पत्रके वाटून प्रचार करणार आहे.

Due to NCP leader Ajit Pawar death party has taken decision that they will not do ZP election promotional campaigns
Shivsena UBT : 'मोदी-फडणवीसांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांड, खोटारडेपणा..., बदनामीबद्दल ते दादांच्या कुटुंबीयांची माफी मागणार का?'

उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. शिवाय विजयी झाल्यांनतरही मिरवणूक काढली जाणार नाही, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता राज्यात अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असतानाच आता पक्षाने देखील या शोकाकूल वातावरणात प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Due to NCP leader Ajit Pawar death party has taken decision that they will not do ZP election promotional campaigns
Shantilal Suratwala Passes Away: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का: पुण्याच्या माजी महापौरांचे निधन

दरम्यान, अजित पवारांच्या पश्चात पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? या चर्चांना देखील उधाण आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवून त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या संबंधित राष्ट्रवादीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवले जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com