Sunil tatkre, sunetra pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar : अजित पवारांच्या अपघाताचा गुन्हा दाखल होताच सुनील तटकरे विधानभवनात सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Maharashtra politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यात वेगवान घडामोडी घडत आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी बंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मुंबईत त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतली आहे.

बारामतीजवळील विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांचे निधन झाले. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी बंगळुरूमध्ये याप्रकरणी 'झिरो एफआयआर' दाखल केला असून, हा अपघात नसून 'सुनियोजित कट' असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, बुधवारी दुपारी खासदार सुनील तटकरे हे विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली या बाबतचा तपशील समोर आलेला नाही. या दोन नेत्यांमध्ये अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ चर्चा सुरु होती.

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी चर्चा झाली. मात्र, या दोन नेत्यांमधील चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली याबाबत सस्पेन्स कायम होता.

दरम्यान, बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मात्र, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT