Parth Pawar birthday : “प्रिय पार्थ…” दादांच्या अनुपस्थितीत वाढदिवस; तटकरेंनी उलगडला वारशाचा मुद्दा, दिल्लीसह पक्ष संघटनेत जबाबदारीचे संकेत?

On Parth Pawar birthday, Sunil Tatkare recalls Ajit Pawar legacy and reminds him of growing political responsibilities : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार नसतानाचा पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
Parth Pawar birthday
Parth Pawar birthdaySarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar son news : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पहिला वाढदिवस आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यानिमित्ताने 'एक्स'वर पोस्ट शेअर करत, पार्थ पवार यांना अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाची अन् त्यांच्या राजकीय वारसा पुढं नेण्याची, आठवण करून दिली आहे.

सुनील तटकरे यांच्या या पोस्टमुळे, पार्थ पवार यांच्यावर दिल्लीत अन् पक्ष संघटनेची लवकरच जबाबदारी मिळणार असे संकेत आहेत, अशी चर्चा आहे. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्दीला दिल्लीतून सुरवात होणार असल्याचे सर्वाधिक संकेत आहेत.

सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "प्रिय पार्थ, यंदा एका वेगळ्याच परिस्थितीत आपण सारेच जण सापडलो आहोत. अजितदादा आपल्यात नसतानाचा हा तुझा पहिला वाढदिवस. अशा परिस्थितीत शुभेच्छा देताना मनात असंख्य आठवणी दाटून येतात."

"अजितदादांचा (NCP) कार्यकर्तृत्वाचा डोंगर फार मोठा होता. तो डोंगर पार करून तू त्या पलीकडे जात कर्तृत्वाची उंची गाठाविस, अजितदादांकडून आलेला वारसा जपत सर्वसामान्य जनतेसाठी झिजावेस आणि तुझ्या कामातून तुझी वेगळी ओळख निर्माण करावीस यासाठी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद!", असेही सुनील तटकरे यांनी पोस्ट म्हटलं आहे.

Parth Pawar birthday
sunetra pawar delhi visit : ‘डबल रोल’वर सुनेत्रा पवार? उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं; खासदारकीबाबत तटकरेंनी दिली मोठी अपडेट

अजितदादांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. अजितदादा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा! त्यांच्या या अपघाती निधनामुळे पवार कुटुंबीयाबरोबर पक्षाला मोठा धक्का बसला. अजितदादांचा राज्यासह देशात कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या या निधनामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्का बसला. यातून धक्क्यातून सावरण्यासाठी पवार कुटुंब खंबीरपणे उभे राहिले.

Parth Pawar birthday
OBC reservation on Sharad Pawar : 'स्थानिक' निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक; भाजपला रोखण्यासाठी काढले 'ओबीसी कार्ड'

अजितदादांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली अस्थिरतेची परिस्थितीला सावरण्यासाठी सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेतला. त्यांच्याबरोबर पार्थ पवार देखील सक्रिय झाले. सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या विधिमंडळाच्या नेतेपदी, पक्षाच्या अध्यक्षपदी आणि उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान केलं.

मुंडे, कोकाटे अन् चाकणकरांमुळे पक्ष अडचणीत...

सुनेत्रा पवार पक्ष संभाळत असल्या तरी, प्रमुख काम अजूनही सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल निभावतात. पक्ष सत्तेत असला, तरी सर्वाधिक टार्गेट होताना दिसतो आहे. अजितदादा असताना देखील, आतासारखीच परिस्थिती होती. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारर्कीद वादग्रस्त ठरला. आता भोंदूबाबामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून राजीनामा द्यावा लागला.

दिल्लीत अन् पक्ष संघटनेची जबाबदारी

या वादाचे धक्के पक्ष संघटनेला कुठेतरी बसत आहेत. यातून सावरण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू असताना, सुनील तटकरे यांनी पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. पार्थ पवार यांना अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून देताना, वारसा देखील जपायला सांगितले आहे. यावरून पार्थ पवार लवकरच दिल्लीत दिसतील अन् पक्ष संघटनेची देखील जबाबदारी घेतील, अशी चर्चा पक्षातंर्गत रंगली आहे.

पार्थ पवारांची राजकीय तयारी

पार्थ पवार यांची राजकीय कारर्कीद पाहिल्यास, ते राजकारणात कुठे जास्त सक्रिय दिसत नाहीत. 2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजकीय पडद्यामागे राहणे पसंत केले. परंतु 2026च्या राज्यसभेच्या उमेदवारीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आता सुनील तटकरे यांच्या पोस्टमुळे पार्थ पवार यांना दिल्लीत अन् पक्ष संघटनेत मोठी राजकीय जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत आहेत.

जय पवार यांची देखील चर्चा

जय पवार देखील राजकारणात सक्रिय होतील, अशी चर्चा आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. पण तशा काही राजकीय घडामोडी घडल्या नाहीत. पण आता सुनील तटकरे यांनी त्याच्या एक्स खात्यावर शेअर केलेल्या पोस्टमुळे पार्थ अन् जय पवार अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com