Suspicious items including lemons and ritual materials found at the crash site raise concerns over possible aghori rituals linked to Ajit Pawar plane crash. 
महाराष्ट्र

Amol Mitkar : अजितदादांचा अपघात झाला तिथे दिवाबत्ती करायला गेलेल्या लोकांना काल काय दिसलं? अमोल मिटकरींनी शेअर केले भयानक फोटो

Ajit Pawar Death Mystery : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे या अपघात प्रकरणी सतत नवनवीन दावे करत आहेत. नुकतंच मिटकरी यांनी अजितदादांच्या अपघातापूर्वी त्यांच्या काटेवाडीतील बंगल्यासमोर काही लोकांनी अघोरी पूजा केल्याचा खळबळजनक दावा केला होता.

Jagdish Patil

Ajit Pawar Death Mystery : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून त्यांच्या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक नेत्यांनी अजितदादांचा अपघात नसून तो घातपात असल्याचं जाहीर वक्तव्य केली आहेत.

तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे या अपघात प्रकरणी सतत नवनवीन दावे करत आहेत. नुकतंच मिटकरी यांनी अजितदादांच्या अपघातापूर्वी त्यांच्या काटेवाडीतील बंगल्यासमोर काही लोकांनी अघोरी पूजा केल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांनी या संबंधित काही फोटो शेअर केले होते.

अशातच आता आमदार मिटकरी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर धक्कादायक फोटो शेअर करत कोणी अजितदादांच्या अपघात स्थळी अघोरी पूजा करतंय का? असा सवाल उपस्थित केला आहे.

अमोल मिटकरी यांनी फोटो शेअर करत लिहिलं की, 'काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या फोटोंमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिटकरी यांनी अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या बांधकाम साइटवर अघोरी पूजा केल्याचे फोटो देखील दोन दिवसांपूर्वी शेअर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT