Sangli News, 26 Apr : "भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, पण राज्यातल्या एका विशिष्ट देवाला मात्र चालते", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठनेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
वाळवा तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातील वातावरणं चांगलंच तापलं आहे. कारण या महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील सुपीक बागायती जमिनींचं भूसंपादन केलं जाणार आहे.
त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात असल्याची भावना लोकांमध्ये आहे. याच मु्द्द्यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, "आम्हाला सर्व देव पावलेत, पण एकच देव पावायचा राहिलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी जुना रस्ता पाहावा किंवा अन्य पर्याय शोधावा, पण हा विनाशकारी रस्ता रद्द करावा. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. वाळवा तालुका दरवर्षी महापुराचा सामना करतो, मात्र तो नैसर्गिक आहे.
पण शक्तिपीठ महामार्ग हे 'मानवनिर्मित संकट' ठरेल. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रस्ता बांधणे हे कोणत्याच देवाला मान्य नाही," असं जयंत पाटील म्हणाले. शिवाय यावेळी त्यांनी या तालुक्याला क्रांतीसिंह नाना पाटलांचा वारसा असून या भागात अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा आहे, असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला. तसंच शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करावा, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.