Ajit Pawar Plane Crash News: अजित पवार यांच्या निधनाला उद्या (ता.२८) महिना पूर्ण होत आहे. अद्यापही त्यांच्या विमान अपघाताची एफआयआर दाखल करून घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण त्यांची FIR दाखल करण्यास पोलिस प्रशासनाने सपशेल नकार दिला आहे. पोलिसांवर कुणी दबाब आणत आहे का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी आज शिवतीर्थवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अजितदादा पवार यांचा विमान अपघात की घातपात या मुद्दावर त्यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा केली. रोहित पवार यांनी या भेटीची माहिती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांनी यावर अजितदादांच्या विमान अपघात प्रकरण तपासावर भाष्य केले आहे. या प्रकरणात सरकारच संशयाचं भूत का नाचवत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. FIR ला सरकार का घाबरतंय? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे काय होत आहे, यावर त्यांनी भाष्य केलं. लोकांच्या मनात अजितदादांच्या विमान घातपाताची शंका का दाटत आहे, यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, "रोहित पवारांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. डीसीपींनी एफआयआर नोंदवून घेण्यास थांबवलं. दोन-तीन वेळेस त्यांचा एफआयआर नोंदवून घेतला नाही. कोणाचा दबाव आहे, असा सवाल करतानाच राज ठाकरे यांनी सरकारकडून संशयाचं भूत नाचवल जात आहे," असा आरोप केला.
आमदार असूनही रोहित पवार यांची एफआयआर घेत नसतील तर सामान्य माणसाचं काय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा अपघात दु्र्देवी आहे. सुनेत्रा पवार सरकारमध्ये आहेत, त्यांनीदेखील याबाबत बोलायला हवं, असेही ते म्हटले.
अजितदादांचा अपघात कसा झाला हे महाराष्ट्राला अद्यापही समजलेले नाही.
एफआयआरबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्या मांडाला हवा
एफआयआर का नोंदवून घेतला नाही, सरकारमध्ये काहीतरी काळंबेर आहे.
या सगळ्या मुद्दांवर सुनेत्रावहिनींनी बोललं पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.