

Non-Teaching Staff to Become Teachers: अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यापुढे शिक्षक, मुख्याध्यापक पदावर नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांना पात्रता पूर्ण केल्यावर शिक्षक पदावर नियुक्ती हवी असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवकांचा कालावधी पूर्ण करावा लागणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.
शिक्षक होण्यास पात्र असलेल्या अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाची अंमलबजावणी आता जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी करणार आहेत. या निर्णयाचा राज्यातील हजारों शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
नियमित शासकीय सवेतील अथवा ज्याचे वेतन अनुदान सरकारमार्फेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत देण्यात येते अशा नियमित, निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखालील १०० टक्के अनुदानित शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर नियमानुसार नियुक्त होतो, त्यावेळी त्याची आहे तिच वेतननिश्चिती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
शिक्षकेतर कर्मचारी यांना पात्रता पूर्ण केल्यावर शिक्षक पदावर नियुक्ती हवी असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवकांचा कालावधी पूर्ण करावा लागणार नाही.त्यामुळे या निर्णयाचा अनेकांना फायदा होणार आहे. खाजगी शाळा ज्यात प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये/शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा या पैकी कोणत्याही शाळेत कर्मचारी सेवक असल्यास त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती होत असताना त्याची आहे तीच वेतननिश्चिती करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. खासगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांपैकी कोणत्याही शाळेत असल्यास त्यांना या निर्णयाचा लाभ घेता येणारा आहे.
या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक, शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सेक्रेटरी शिवाजी खांडेकर यांनी स्वागत केले आहे. "सरकारनामा"सोबत बोलताना शिवाजी खांडेकर म्हणाले,"10 जून 2005 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील काही पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर पदोन्नती घेताना शिक्षण सेवक योजना लागू करण्यात येत होती त्यामुळे अनेक शिक्षकेतर कर्मचारी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करीत होते किंवा शिक्षक पदावरील पदोन्नती स्वीकारत नव्हते परंतु या शासन निर्णयामुळे त्यांच्या अंतिम वेतनाचा टप्पा किंवा नवीन वेतनश्रेणीत समाविष्ट असल्यास त्या टप्प्यावरील वेतनश्रेणी मिळणार असल्यामुळे अनेक शिक्षकेतर कर्मचारी यापुढे शिक्षक होतील व मुख्याध्यापक ही होतील,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.