Technical fault in Ajit Pawar plane Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash Update: नेमकं काय घडलं 'त्या' काही सेकंदात? अजितदादांच्या विमान अपघातात तांत्रिक बिघाड की घातपात? 'मिस्ट्री' उलगडणार!

What happened in Ajit Pawar plane incident: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा अपडेट. त्या काही सेकंदांत नेमकं काय घडलं? तांत्रिक बिघाड की घातपात? वाचा सविस्तर तपासाची माहिती.

Rashmi Mane

Ajit Pawar flight incident full details: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागून राहिलेला प्राथमिक तपास अहवाल आज सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अहवाल Aircraft Accident Investigation Bureau तयार करून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे सुपूर्द करणार आहे. या अहवालातून अपघातामागील खरे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.

गेल्या महिनाभरात या घटनेने राज्यात अनेक प्रश्न निर्माण केले. अजितदादांच्या अपघाताच्या त्या काही सेकंदांत नेमके काय घडले? विमान हवेत असताना इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला होता का, की इतर काही कारण होते? या सर्व शक्यतांचा सखोल तपास करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित हाती लागला असून, त्यातील ध्वनिमुद्रण आणि उड्डाणासंबंधी तांत्रिक माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. वैमानिकाचे शेवटचे संभाषण, इंजिनची कार्यस्थिती आणि इतर तांत्रिक आकडेवारी यावरून अपघाताचा उलगडा होऊ शकतो.

विमानाची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. नियमित तपासणी योग्य पद्धतीने झाली होती का, काही त्रुटी दुर्लक्षित राहिल्या होत्या का, याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक अहवालात या बाबींवर स्पष्ट भाष्य होण्याची शक्यता आहे.

अपघातानंतर झालेल्या सुरक्षाआढाव्यात संबंधित कंपनीच्या विमानांमध्ये काही त्रुटी आढळल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने उर्वरित पाच विमाने उड्डाणासाठी रोखून धरली आहेत. या कारवाईमुळे कंपनीवर मोठा परिणाम झाला आहे.

आज सादर होणारा प्राथमिक अहवाल हा संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तांत्रिक बिघाड की घातपात, या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतरच या गूढ घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे. राज्यातील नागरिकांना आणि पवार कुटुंबीयांना या अहवालातून स्पष्टता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT