Ajit Pawar Political News Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Political News : अजितदादांची राष्ट्रवादी ९० जागा लढवणार ! मग शिंदे-भाजप किती ?

Shivsena : तडजोडी कराव्या लागतील, आता अर्धीच भाकरी खावी लागेल, अशी विधाने गोगावले, शिरसाट यांच्याकडून केली जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणाऱ्या अजित पवार यांचे आज कार्यकर्त्यांना उद्देशून झालेले भाषण अनेक गौप्यस्फोट करणारे ठरले. (Ajit Pawar Political News) अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले ३५ आमदार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिंदेंची शिवसेना यांच्यासोबत एकत्रित लढणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी आपल्या भाषणातून केला.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर विधानसभेच्या ९० जागा आपण लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर सांगून टाकले. यामुळे शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेच्या भूवया मात्र निश्चितच उंचावल्या असणार. आधीच अजित पवार (Ajit Pawar) व त्यांच्या समर्थक आमदारांच्या सरकारमध्ये सामील होण्याने मुख्यमंत्री आणि गेल्या वर्षभरापासून मंत्रीमंडळात संधी मिळेल म्हणून कोट, जॅकेट शिवून तयार असलेले आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

तडजोडी कराव्या लागतील, आता अर्धीच भाकरी खावी लागेल, अशी विधाने भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्याकडून केली जात आहेत. (NCP) यातून शिंदेंच्या शिवसेनेत असलेली खदखद समोर येत आहे. त्यात अजित पवार यांनी आज २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ९० जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे गटाची काळजी अजूनच वाढली आहे.

३५-४० आमदार सोबत घेवून येणारे अजित पवार ९० जागांवर दावा सांगत आहेत, भाजपचे १०७ आमदार सध्या असल्यामुळे ते किमान दीडशे जागांवर दावा सांगण्याची शक्यता आहे. मग शिंदे गटाला किती जागा मिळणार? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार घालवण्यासाठी शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात शिवसेनेचे ४० आमदार सहभागी झाले होते.

याशिवाय बच्चू कडू यांच्यासह इतर अपक्ष अशा दहा जणांनी या बंडाला साथ दिली होती. त्यामुळे या दोघांची मिळून संख्या ५० वर जाते. मग अजित पवार ९०, भाजप १५० विधानसभेच्या जागांवर लढणार असेल तर मग शिंदेच्या वाट्याल फक्त ४८ जागा येणार का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. अजित पवार यांच्या ९० विधानसभेच्या जागा लढवण्याच्या विधानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT