Ambadas Danve On NCP Crisis
Ambadas Danve On NCP CrisisSarkarnama

Ambadas Danve On NCP Crisis : राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी शंभर कोटी ? विनवणी अन् दमदाट्याही...

Maharashtra Political : पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का? असा सवाल देखील केला आहे.
Published on

Shivsena : तीन दिवसांपुर्वी राज्यात भूकंप झाला, राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला आणि थेट सरकारमध्ये सहभागी झाला. (Ambadas Danve On NCP Crisis) अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर एकूण ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सगळे घडले कसे? अजित पवारांसोबत खरचं किती आमदार आहेत?

Ambadas Danve On NCP Crisis
NCP Rebellion Separate Meetings : आमच्या साहेबांना बडव्यांनी घेरलंय...; भुजबळांचा रोख जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच !

असे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात असतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी (NCP) राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला शंभर कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. (SHIVSENA) या संदर्भात डील सुरु असल्याची बातमी आपल्या कानावर आली असून काही जणांना विनवण्या तर काहींना दमदाटी केली जात असल्याचा आरोप देखील दानवे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींचा निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! (Maharashtra) शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का? असा सवाल देखील केला आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादीतून फुटून सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची व शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीतील बंडाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या गटाला ३६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. आमच्याबरोबर ४० आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी केलेले हे ट्विट महत्वाचे ठरत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com