Amol Kolhe, AJit pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar vs Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा 'तो' दावा अजित पवारांनी खोडला

Sachin Waghmare

Ncp News : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत न गेल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार कोल्हे यांचा निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला असून त्यांनी तसे आव्हान ही दिले आहे. त्यामुळे या दोघांतील वाद सध्या गाजत आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडत नसल्याने त्यांच्यातील कलगी-तुरा चांगलाच रंगला आहे.

महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही. येत्या काळात कोणाताच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी विरोधक निवडणुकीच्या तोंडावर कोणताही मुद्दा नसल्याने हा मुद्दा काढत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला जाणार असल्याच्या कारणावरून केंद्र सरकारला कोणीच जाब विचारत नाही. आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका, हे सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही. राज्य सरकार केंद्र सरकारला नजर भिडवू शकत नाही, अशी टीका खासदार अमोल कोल्हेंनी (Amol kolhe) केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुत्राप्रमाणे निधीवाटप करतोय

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर आपल्याला विकास निधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजपच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी केला होता. याबाबत बोलताना अजित पवार (ajit pawar) यांनी निधीवाटपाचा चेंडू भाजपच्याच कोर्टात टाकला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोलापूरमध्ये निधीवाटपाचं जे सूत्र ठरवलं आहे. त्याच सूत्राप्रमाणे पुणे जिल्ह्यात निधीचे वाटप करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाला बोलताना दिली.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT