Anjali Damaniya , Ajit Pawar
Anjali Damaniya , Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अंजली दमानियांच्या आरोपांना अजितदादांचे प्रत्युत्तर; म्हणाले, माझी नार्को टेस्टची तयारी पण...

Sachin Waghmare

NCP Politcs : पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या कार अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. या अपघाताची चर्चा सर्वत्र झाली. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ससूनमधील कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे.

या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंवर (Sunil Tingre) अनेक आरोप झाले आहेत. टिंगरे यांनी या प्रकरणातील आरोपी वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत. त्यामुळे टिंगरे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. (Ajit Pawar News )

त्यामुळे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे. अंजली दमानियांनी यांनी अजित पवारांचा फोन काढून घेऊन त्यांची नार्को टेस्टची करण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली होती.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेवेळी भाष्य करताना "माझी नार्को टेस्टची तयारी आहे. पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने (अंजली दमानियाने) पुन्हा कुठे पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासर्व प्रकारामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, दमानिया यांच्या या मागणीवर राष्ट्रवादीचे (Ncp) प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. अजितदादांची नार्को टेस्ट करणार असाल तर मग अंजली दमानिया यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे.

यामध्ये सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की, यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न होता जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तशा प्रकारचा तपास सुरू आहे. ज्या मुलांनी तो अपघात घडवला तोही आतमध्ये आहे. त्याच्या बापाला ही आतमध्ये घेतला आहे. त्याच्या बापाच्या बापाला ही आतमध्ये घेतला आहे. कायद्याने आणि नियमाने जी चौकशी व्हायला हवी ती सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले.

आपल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहवी ती कायदा व्यवस्था सुरू असताना नाहक निष्पाप माणसांना त्रास होऊ नये. चुकीच्या पद्धतीने जर कोणी दोन नंबरचा व्यवसाय पाहत असतील आणि त्याच्यातून दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशांवर करण्यात कारवाई करण्यात यावी, असेही अजित पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT