Jitendra Awhad News : '...तर सगळी मनुस्मृती अभ्यासक्रमात येईल', जितेंद्र आव्हाडांचा दावा

Deepak Kesarkar : अस्पृश्यता आणि समाजातील सर्वच वर्गातील स्त्रियांबाबत अन्यायकारक असणाऱ्या मनुस्मृतीमधील काही गोष्टी केसरकर यांना आवडायला लागल्या आहेत, असे आव्हाड म्हणाले.
Jitendra Awhad
Jitendra Awhad sarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad : शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या समावेशावरून राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात होऊ नये म्हणून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तर, मनुस्मृती नव्हे तर त्यातील दोन श्लोकांचा समावेश पाठ्यपुस्तकांमध्ये असणार असल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. केसकरांच्या या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवारी) महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन केले. तसेच मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश झाला तर अजित पवार राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनुस्मृतीतील दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असतील तर हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार नाही का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तसेच मनुने जे स्त्रींयाच्या विषयी लिहिले आहे ते तुम्हाला मंजूर आहे का? असा सवालही आव्हाड Jitendra Awhad यांनी मनुस्मृती दहनासाठी जमलेल्या नागरिकांना विचारला.

Jitendra Awhad
Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, जमावाची तरुणाला बेदम मारहाण

दीपक केसरकरांवर टीका

ट्विटच्या माध्यमातून आव्हाड यांनी शिक्षणमंत्री केसरकरांवर Deepak kesarkar देखील टीका केली आहे.दीपक केसरकर हे म्हणतात की, मनुस्मृतीमधील काही चांगले, बौद्धिक बळ देणारे श्लोक आम्ही शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार आहोत." एकीकडे जातीद्वेष, जातीभेद, अस्पृश्यता आणि समाजातील सर्वच वर्गातील स्त्रियांबाबत अन्यायकारक असणाऱ्या मनुस्मृतीमधील काही गोष्टी केसरकर यांना आवडायला लागल्या आहेत. उद्या यांना सबंध मनुस्मृती आवडायला लागेल, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांचे सूचक वक्तव्य

मनुस्मृतीच्या श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) विरोध केला आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात सामाजिक संस्था, शिक्षणसंस्था विरोधी भूमिका घेतील, असे म्हटले होते.

Jitendra Awhad
Pune Porsche Accident : माज उतरेना! बाप-लेकाकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे; चालकाचे धक्कादायक खुलासे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com