Ajit Pawar, Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

रोहित पवार 'उपटसूंभ...' त्या वक्तव्यावर अजित पवार भडकलेच; म्हणाले, 'मी प्रत्येक...'

Ajit Pawar On Rohit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक नाही तर दोन तीन गट पडले आहेत. कोकणातील त्यांचा नेता तर स्वत:ला बॉस समजतो असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. अजित पवारांनी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी गटबंदीबाबतच्या वक्तव्यावर "मी प्रत्येक उपटसूंभाला उत्तर देणार नाही" अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

  2. माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि आपण मिळून घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  3. अहिल्यानगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते.

Ahilyanagar news : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाल्याचा दावा केला होता. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील जोरदार प्रतिहल्ला चढवला होता. दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रोहित पवार यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रोहित पवार यांचा उल्लेख उपटसूंभ असा करताना निशाना साधला आहे. तसेच असे कोणीही उठून काहीही बोलेलं त्याला मी उत्तर द्यायला बांधील नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. ते अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरणासाठी आले असताना बोलत होते. (Ajit Pawar strongly responds to Rohit Pawar's NCP group division comment during Ambedkar statue unveiling event in Ahilyanagar)

राज्यात एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा जोर धरत असतानाच रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने राष्ट्रावादीचे दोन गट तयार झाले. एक शरद पवारांचा आणि एक अजितदादांचा. अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेली. तर आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आमचा पक्ष एकसंघ आहे. पण अजितदादांच्या राष्ट्रवादीत 2 नाही तर 3 गट झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या राष्ट्रावादीतील कोकणातील एक नेते तर स्वत:ला बॉस समजतात. त्यांच्यावर पत्ते फेकल्यावर काहीजण मारहाण करतात असं म्हणत रोहित पवारांनी तटकरेंवर निशाना साधला होता. ज्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान रोहित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, अजित पवार म्हणाले, कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू असंही म्हटलं आहे.

कोणी फुकट्याचा सल्ला

तसेच अजित पवार यांनी, आमच्या पक्षात किती गट आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ, इतरांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. कोण काय बोलतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही.

काहींनी गैरफायदा घेतला

लाकडी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे समोर आलं आहे. राज्यात जवळपास 14 हजार पुरूषांनी लाकडी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. याबाबत अजित पवार म्हणाले की, ही योजना राज्यातील गोर गरीब महिलांसाठी आहे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा महिलांसाठी आहे. पण मध्यंतरी काही नोकरदार भगिनी या योजनेत सहभागी असल्याचे उघड झाले होते. आतातर पुरुषांनी देखील लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. यामुळे असा कोणी फायदा घेतला असेल तर त्यावर सरकार योग्य निर्णय घेईल. त्यांनी पैसे लाटले त्यांच्याकडून ते वसुल करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. अजित पवारांनी रोहित पवारांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली?
→ अजित पवार म्हणाले, "कुठलाही उपटसूंभ काहीही बोलेल आणि मी त्याला उत्तर द्यावं, असं नाही."

2. कार्यक्रम कुठे झाला होता?
→ कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथे झाला होता.

3. माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
→ मंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि आपण मिळून घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.

4. रोहित पवारांनी नेमकं काय आरोप केला होता?
→ त्यांनी राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचं वक्तव्य केलं होतं.

5. यामुळे कोणत्या पक्षात गोंधळ निर्माण झाला आहे?
→ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अंतर्गत मतभेदाची चर्चा उफाळून आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT