Rohit Pawar's emotional tweet on Ajit Pawar legacy 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्देवी निधन झाले. त्यानंतर कर्जत शहरात नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करणारे प्लेक्स शहरता लावले होते. मात्र, हे प्लेक्स अंत्यत वाईट पद्धतीने हटवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
रोहित पवार म्हणाले, 'माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले.'
'ही बाब अत्यंत संतापजनक, मा. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी.', अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व रोहित पवार करतात. मात्र, कर्जत नगरपालिका ही भाजपच्या ताब्यात आहेत. या नगरपालिकेवर सभापती राम शिंदे याचे वर्चस्व आहे. दरम्यान, युवक राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने हा प्रकार झाला असून, कोणाच्या भावना दुखवण्याचा हा प्रकार नसल्याचा खुलासा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.