

Mumbai-Pune Propane Gas Tanker Spill: आडोशी बोगद्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी सांयकाळी अपघात झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील ‘प्रोपिलीन’ गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
टँकरमध्ये ‘प्रोपिलीन’ हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला होता. संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन तातडीने सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे.
महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक पूर्णतः थांबवली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूकही काही प्रमाणात नियंत्रित केली आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. जोपर्यंत परिसर पूर्णतः सुरक्षित घोषित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:
१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)
कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.
Emergency Helpline Numbers:
* Expressway Control Room: 9822498224
* Highway Police: 9833498334 / 100
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.