Ajit Pawar Death News in Marathi Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: बारामतीत अजितदादांना मुखाग्नी दिला; तिकडे वरळीत पिंकी माळींना शेवटचा निरोप देण्यासाठी जमली गर्दी

Ajit Pawar Last Rites: अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. या अपघातात पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा देखील मृत्यू झाला.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Funeral : बारामती विमानतळाजवळ बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास झालेल्या विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. या अपघाताने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. या अपघातात पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा देखील मृत्यू झाला.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास बारामतीत अजितदादांना मुखाग्नी देण्यात आला. तर तिकडे पिंकी माळी यांचे पार्थिव सासरी कळवा येथे आणण्यात आले होते. त्यानंतर माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले. याठिकाणी शेवटचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. पिंकी यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आल्यानंतर पतीला अश्रु अनावर झाले. यावेळी ते धाय मोकलून रडले.

बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून बारामतीच्या दिशेने रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 5 जण विमानातून प्रवास करीत होते. यावेळी विमानातील पाचही जणांचे निधन झाले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास बारामतीत अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तर अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री उशिरा तरडगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, पिंकी माळी यांचा पार्थिव सासरी कळवा येथे आणल्यानंतर माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आला.

पिंकी माळी यांच्या निधनाची बातमी समजताच माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पिंकी माळी यांचे पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी तिच्या सासरी कळवा येथे काही वेळ आणण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले. पिंकी माळीच्या वडिलांना अश्रु अनावर झाले. तर, पिंकीच्या पतीला हे दु:ख पचवणे कठीण जात आहे. त्यांनी आपल्या संसाराला तीन वर्षांपूर्वीच सुरूवात केली असल्याची माहिती आहे.

पिंकी माळी यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पिंकीच्या आवडीनिवडीनुसार पती सोमकर हा कळवा येथील राहत्या घरी फर्निचरचे काम करीत होता. प्रत्येक सणावारांमध्ये हे जोडपे सोसायटीमधील कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने सहभागी होत होते.

दरम्यान, पिंकीच्या निधनानंतर पती सोमकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंकी यांचा पार्थिव सासरी कळवा येथून आणल्यानंतर तिच्या माहेरी वरळी येथील निवासस्थानी नेण्यात आले. पतीने पाणावलेल्या डोळ्यांनी पिंकीचे अंत्यदर्शन घेतले. पिंकी माळींना शेवटचा निरोप देण्यासाठी गर्दी जमली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT