Mumbai News : गेल्या चार दिवसापासून राज्याचे कृषिमंत्री कृषिमंत्री दत्तात्रय भरणे दुष्काळी भागाचा दौरा करीत आहेत. त्याठिकाणी आढावा बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या आढाव्यावेळी वेगवेगळ्या घटना व घडामोडी होत असल्याने हा दौरा काहीसा राज्य सरकारच्याअडचणी वाढविणारा ठरत असल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. हिंगोलीतील बैठकीत राजकीय मंडळीने काजू-बदाम खाण्यावर भर दिला तर त्यांनतर अकोल्यातील दुष्काळ आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी डुलक्या काढल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच या बैठकीत काही अधिकारी मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे समोर आले आहे. त्यावर कृषिमंत्री भरणेंनी थेट इशारा दिला आहे. भरणे म्हणाले, या अधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवले पाहिजे.
अकोल्यातील दुष्काळ आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी डुलक्या काढल्याचे समोर आलं. तर काही अधिकारी मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे समोर आले आहे. तर काही अधिकारी व्हॉट्सअॅप पाहत होते. तर काही फेसबुक लाईव्ह, इन्स्टाग्राम लाईव्ह पाहत होते. यावरून दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य नसल्याची टीका प्रशासनावर होत आहे. यावर आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, असा सल्ला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.
गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. या दौऱ्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्यातच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका बैठकीत काही अधिकारी डुलक्या काढत असल्याचे समोर आले आहे.
यावर भरणे म्हणाले, बैठकीला साडे तीनशे अधिकारी होते. प्रत्येक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. कलेटक्टर, जीडीए, कृषी आयुक्त, सचिव, विभागीय आयुक्त, महसूल यंत्रणा, एमएसईबीचे अधिकारी होते. सर्व जण होते. इतक्या अधिकाऱ्यांमध्ये एखाद दुसरा असेल. खरंतर आता शेतकरी खूप अडचणीत आहे. .तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे. कोण काय करतो , म्हणण्यापेक्षा रिझल्टवर लक्ष दिलं पाहिजे. पाठिमागे कोण करतंय… परंतु अधिकाऱ्यांनी गांभीर्य घेतलं पाहिजे’.
यावेळी माध्यमाशी बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांवर अतिरिक्त व्याज आकारल्याचा संशय आहे, कारवाई केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या, कर्ज कमी असताना ज्यादा दाखवून सरकारची फसवणूक करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्री, सहकार विभागाच्या माध्यमातून कडक कारवाई होईल, अशी कोणत्या बँकेची हिंमत झाली नाही पाहिजे. याची चौकशी होईल, असे भरणे म्हणाले.
परवा मी पुणे विभागाचा आढावा घेणार आहे. मी गुरुवारी नागपूर, तर शनिवारी नाशिक विभागाचा आढावा घेणार आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. शेवटी शेतकऱ्यांचा आक्रोश साहजिकच आहे. आम्ही शेतकरी आहोत. ज्याचं कळतं, त्याला कळतं. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. दौरा करून ही परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे राज्य सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसोबत आहे. राज्य शासनाची मदत, पीक विम्याची मदत असेल, जी शक्य आहे, ती मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.