Sanjay Jadhav Cashew Almond Video : दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून वाद; भरणेंचं स्पष्टीकरण, जाधव म्हणाले...

Sanjay Jadhav cashew-almond video sparks controversy at Marathwada drought review meeting : काजू-बदामाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांच्या टीकेला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार संजय जाधव यांनी दिलं प्रत्युत्तर
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Drought News : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे.

नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील खासदार संजय जाधव यांचा काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करत, ‘शेतकरी उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी’ असा आरोप केला.

या टीकेनंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “काजू-बदाम आमच्यासमोर आलेच नाहीत. आम्ही ते पाहिलेही नाहीत. जर कोणी खाल्ले असतील तर ते शुगर पेशंट असतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.नांदेडमध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुमारे चार तास चालली. यावेळी मराठवाड्यातील 76 तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचं मंत्री भरणे यांनी सांगितलं.

“या बैठकीत चार तास मी एका खुर्चीवरून हललो नाही. एखादा आमदार किंवा खासदार (MP) शुगरचा पेशंट असेल, तर त्यांनी खाल्ले असतील. आमच्यासमोर तर काही आले नाही,” असं भरणे म्हणाले. तसेच, एखाद्याच्या आरोग्याशी संबंधित बाबींवरून आरोप करणं योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे काजू-बदामाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

Dattatray Bharne
Nagaon Lok Sabha Bypoll : वादग्रस्त अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीला 3 सप्टेंबरला मंजुरी, 5 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश अन् आज लोकसभेची उमेदवारी जाहीर

दरम्यान, या बैठकीतील खासदार संजय जाधव यांचा काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधी काजू-बदाम खात असल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. व्हिडिओमुळे सोशल मीडियावरही या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Dattatray Bharne
Ahilyanagar DCC Bank Election : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ढाकणेंच्या शिलेदाराचा मार्ग मोकळा, भाजप आमदार राजळे समर्थकांना धक्का?

व्हिडिओवरून होत असलेल्या टीकेवर खासदार संजय जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “समोर ताट वाढल्यावर खाणं चुकीचं आहे का?”, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. रोधकांच्या टीकेला आपण फारसं महत्त्व देत नसल्याचं सांगताना जाधव यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली.

काजू-बदामाच्या मुद्द्यापेक्षा दुष्काळाची चर्चा महत्त्वाची?

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका बैठकीतील व्हिडिओवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असले, तरी दुष्काळग्रस्त भागासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना आणि मदतीची घोषणा केली जाते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com