mobile game  Sarkarnama
महाराष्ट्र

Akola drought review meeting : मराठवाड्यात काजू-बदाम अन् अकोल्यात प्रशासनाकडून जनतेची थट्टा! विभागीय आढावा बैठकीप्रसंगी अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त!

Akola drought review meeting News : हिंगोलीतील बैठकीप्रसंगी खासदार व लोकप्रतिनिधींनी काजू-बदाम खाण्यावर भर दिल्याचा प्रकार समोर आला तर या प्रकारानंतर रविवारी अकोल्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा समोर आला आहे.

Sachin Waghmare

Akola News : राज्यात पावसाळा संपत आला असून गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून, शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. त्यातच शनिवारी हिंगोलीतील बैठकीप्रसंगी खासदार व लोकप्रतिनिधींनी काजू-बदाम खाण्यावर भर दिल्याचा प्रकार समोर आला तर या प्रकारानंतर रविवारी अकोल्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा समोर आला आहे. अमरावती विभागीय आढावा बैठकीप्रसंगी अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने प्रशासनाकडून जनतेची थट्टा केली जात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हिंगोलीतील दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामच्या मुद्द्यानंतर आता अकोल्यातही असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. अकोल्यात रविवारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलावलेल्या अमरावती विभागीय आढावा बैठकीत अधिकारी चक्क मोबाईलच्या खेळात दंग असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात रविवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंधारण मंत्री संजय राठोड, कामगार खात्याचे मंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, आदिवासी मंत्री अशोक उईके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते तर आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन उपस्थित होत्या. अमरावती विभागातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांनीही बैठकीत सहभाग घेतला होता.

ही बैठक सुरू असातना या बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी मोबाईल पहाण्यात व्यस्त होते. कोणी व्हॉट्सअप पहात होते. तर कोणी फेसबुक पहात होते. यावरून अधिकारी शेतकऱ्यांबद्दल किती संवेदनशील आहेत, हे दिसून आले. एकीकडे कृषिमंत्री म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणतो आणि आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहोत. मात्र दुसरीकडे अधिकारी मोबाईलवर व्यस्त असल्याचे पहायला मिळत आहे. यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT