Drought News : नांदेडमध्ये कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत परभणीचे खासदार संजय जाधव काजू-बदाम खाताना दिसले. राज्यात दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच खासदार जाधवांनी काजू-बदामवर ताव मारल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळ आढाव्यासाठी विभागीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भरणे यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार संजय जाधव उपस्थित होते. याशिवाय नांदेड, परभणी आणि हिंगोलीतील आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत प्रशासनाने नाश्त्याला काजू आणि बदामच्या प्लेट्स ठेवल्या होत्या.
दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, 'अधिकाऱ्यांना हंटर काढून कातडे सोलून काढले पाहिजे. यांना संवेदनशीला आहे की नाही? शेतकऱ्यांच्या बैठक जेथे होत आहे त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. बैठकांच्या नाटकांची गरज नाही, सरळ दुष्काळ जाहीर केला पाहिजे.'
सुषमा अंधारे यांनी देखील बैठकांची नाटकं कशासाठी सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत म्हटले कीस मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहे. जनावारांच्या पाण्याचा, वैरणीचा प्रश्न आहे. बैठकीत काजु बदाम खाणे हे शेतकऱ्यांच्या जखमा जोळणारी दृश आहे. बैठकीचा फार्स का? सरसकट दुष्काळ जाहीर करत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसऱ्या बाजूला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले आहे. "अधिकाऱ्यांना कुठे काय करावे याचा कोणताही प्रोटोकॉल नाही. ते उद्या एखाद्याच्या मयतीतही काजू-बदामची प्लेट ठेवतील, असा संताप व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.