BJP leader Sharda Khedkar celebrates after being elected as Akola Municipal Corporation Mayor. Sarkarnama
महाराष्ट्र

Akola Mayor : महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील पहिल्या महापौराची निवड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपला साथ; ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव

Akola Municipal : अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्याने भाजपने काठावरचा विजय मिळवला आहे.

Hrishikesh Nalagune

Akola Mayor : महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील पहिल्या महापौराची निवड संपन्न झाली आहे. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांच्या साथीने 38 नगरसेवकांसह काठावरचे बहुमत असलेल्या भाजपने विजय मिळवला आहे. खेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुरेखा काळे यांचा पराभव केला आहे.

अकोला महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना सत्तेसाठी केवळ 3 जागांची गरज होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने भाजपने 41 चा आकडा पार केला. पण यात भाजपला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही साथ दिली. त्यानंतर भाजपने 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करीत बहुमताचा आकडा पार केला आहे.

या निवडणुकीत भाजपने 38, काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 6, वंचित बहुजन आघाडी 5, एमआयएम 3, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1,आणि अपक्ष 3 अशा जागा जिंकल्या आहेत. यातील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि अपक्ष यांनी एकत्र येत येत भाजपसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र, भाजपने त्यामध्ये आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे.

आमदार रणधीर सावरकर : सत्तास्थापनेमागील ‘धुरंधर’

भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे या संपूर्ण सत्तास्थापनेमागील मुख्य सूत्रधार ठरले आहेत. संख्याबळ असूनही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली राजकीय जुळवाजुळव, मित्रपक्षांशी संवाद आणि योग्य वेळ साधणे या सर्व बाबी सावरकर यांनी अत्यंत कुशलतेने हाताळल्या.

शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करत त्यांनी विश्वासाचे वातावरण निर्माण केले. विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी पडद्यामागे हालचाली वेगाने पूर्ण केल्या. परिणामी, भाजपकडे बहुमत असल्याची घोषणा केवळ शब्दांत न राहता ती प्रत्यक्षात साकार झाली.

या यशस्वी सत्तास्थापनेमुळे रणधीर सावरकर यांची ओळख फक्त आमदार म्हणून नव्हे, तर प्रभावी राजकीय रणनीतीकार म्हणून अधिक ठळकपणे समोर आली आहे. आगामी काळात अकोला जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरेल यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT