Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Akshay shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राजकारण तापलं; शरद पवार यांचं सूचक ट्विट

Badalpur Encounter News : या एन्काऊंटरवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले असून या घटनेमागे षडयंत्र असून प्रकरण दाबण्यासाठी अक्षय शिंदे याची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याने खळबळ उडाली आहे. एसआयटी पथकातील पीएसआय नीलेश मोरे आणि संजय शिंदे हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समुळे त्याचा एन्काऊंटर केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या एन्काऊंटरवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले असून या घटनेमागे षडयंत्र असून प्रकरण दाबण्यासाठी अक्षय शिंदे याची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Akshay shinde Encounter News)

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. परंतू, या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटले आहे.

नाना पटोले काय म्हणाले ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल केला आहे. नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

गृहमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

पोलिसांवर गोळी झाडली. हवेत फायरिंग केली. त्यामुळे पोलिसांनी संरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला आहे. त्याला डॉक्टर ऑफिशियली मृत घोषित करतील. पण माहितीनुसार त्याचा मृत्यू झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT