MVA News : 'मविआ'ने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा; ठाकरे गटाच्या 'या' आमदाराचे साकडे

Political News : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु असतानाच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अजूनही दावे प्रतिदावे सुरु आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. येत्या काळात लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे गृहीत धरून प्रत्येक पक्ष आता जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु असतानाच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अजूनही दावे प्रतिदावे सुरु आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही मुख्यमंत्री पदावरून हेवेदावे सुरु आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून एकमेकांवर कुरघोडी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. (MVA News)

येत्या काळात महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.

शिवसेनेचा धनुष्यबाण चोरणारे भाजप आणि शिंदे हे रावण आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. शिवसेना सोबत असल्यानेच काँग्रेस एका खासदारांवरून 13 खासदारांवर गेली आणि भाजप 23 खासदारांवरुन 9 खासदारांवर गेल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले.

Uddhav Thackeray
Girish Mahajan Vs Eknath Khadse : 'स्मिता वाघांना पाडण्यासाठी खडसेंनी फोन फिरवले, त्यांची ऑडिओ क्लिप..'; महाजनांचा गौप्यस्फोट

शिंदे गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार

यावेळी नितीन देशमुख यांनी शिंदे गटाच्या आमदारावर जोरदार टीका केली. शिंदे गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं नाही तर राजकारणात राहणार नाही. शिंदेचा आमदार बुरखे वाटतो तेव्हा हिंदुत्व सोडलं असं का म्हणत नाही? अशी सुद्धा त्यांनी विचारणा केली.

हरवण्यासाठी रचला जातोय कट

वंचित बहुजन आघाडीला सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना टोला लगावला. ठाकरेंच्या शिवसेनेला हरवण्यासाठीच भाजप वंचितला मदत करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. मला हरवण्यासाठी रणनीती नव्हे तर कट रचण्यात येणार असल्याचा आरोप सुद्धा नितीन देशमुख यांनी केला.

Uddhav Thackeray
NCP News : मेहबूब शेख यांच्यावर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com