Amol Kolhe Sarkarnama
महाराष्ट्र

Amol Kolhe : 'एका 'एन्काऊंटर'ने न्याय ही धूळफेक'; खासदार कोल्हेंनी आकडेवारीवरून फडणवीसांना घेरलं

MP Amol Kolhe reveals Devendra Fadnavis figures of violence against women in Nagpur district : बदलापूरमधील बाललैंगिक अत्याचारातील आरोप अक्षय शिंदे ठार झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचा आकडा सांगितला.

Pradeep Pendhare

Mumbai News : बदलापूर बाललैंगिक अत्याचारातील मुख्य आरोप अक्षय शिंदे आणि पोलिसांच्या झटापटीत, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. अक्षय शिंदेच्या या 'न्याय एन्काऊंटर'वरून विरोधकांनी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून, राज्यातील इतर गंभीर घटनांकडे लक्ष वेधले आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी थेट भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचा आकाडा समोर आणत घेरलं आहे.

पोलिसांशी (police) झालेल्या झटापटीत अक्षय शिंदे याला ठार केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसमोर वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत घेरलं जात आहे. नराधमाला शिक्षा व्हायलाच हवी होती, पण राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायद्यानुसार शिक्षा झाली असती, तर कायद्याची जरब निर्माण झाली असली, असं विरोधकांचं म्हणणं आहे.

एका एन्काऊंटरने न्याय होत नसतो, याकडे देखील विरोधकांनी लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर 'एक्स' खात्यावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचा आकडा मांडला आहे.

अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढणाऱ्या महायुती सरकारमधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात महिलांवरील अत्याच्याराच्या 213 घटना घडल्या आहेत. केवळ एका एन्काऊंटरने न्याय मिळाला, असं कोणाला वाटत असेल, तर ही मोठी धूळफेक आहे".

न्यायालयाने चौकशी करावी

बदलापूरमधील नराधमांना शिक्षा व्हायलायच हवी होती. परंतु बदलापूरमध्ये ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा भाजपशी निगडीत असलेल्यांची आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं अक्षय शिंदेबरोबर गेली आहेत. बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालढकल, इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणं, ही पार्श्वभूमी देखील आहे, असा गंभीर मुद्दा अमोल कोल्हेंनी उपस्थित केला. तसंच बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणे गरजेचं आहे, अशी मागणी देखील अमोल कोल्हेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT