Sudhir Mungantiwar : सरकारच्या लोकप्रिय योजनांत खोडा घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण? मुनगंटीवारांनी कोणाला दिला इशारा...

Mahayuti Government : काही अधिकारी आचारसंहिता लागू होण्याची वाट पाहत विषय रेंगाळत ठेवत आहेत, अशी तक्रार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही केली आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 24 September : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लोकप्रिय योजना जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी त्याचा फायदा व्हावा, हा त्यामागचा हेतू उघड आहे. पण महायुती सरकारच्या या घोषणांमध्ये काही अधिकारी खोडा घालत असल्याचा आरोप करत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, विजबिल माफी, महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्या योजना तातडीने लागू व्हाव्यात, यासाठी सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून प्रयत्नांची पराकष्टा केली जात आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून तेवढ्या गतीने कामे पुढे जात नसल्याची तक्रार सरकारमधील मंत्र्यांकडून ऐकू येऊ लागली आहे.

काही अधिकारी आचारसंहिता लागू होण्याची वाट पाहत विषय रेंगाळत ठेवत आहेत, अशी तक्रार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही केली आहे. काही अधिकारी हे विरोधकांच्या सांगण्यावरून काम करतात, त्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज द्यायला हवी, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर घेणार मोठा निर्णय; ‘नीरा भीमा’च्या सभेत दिले संकेत

सध्या काही महत्वाचा विषय असेल तर आचारसंहिता लागू होईपर्यंत तो कसा टाळता येईल, असा प्रयत्न काही मोजके अधिकारी करत आहेत. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयाला कुठेतरी कमी जास्त होईल, असे काही अधिकारी वागत आहेत. त्यामुळे त्या अधिकऱ्यांना समज देण्याची आवश्यकता होती, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

आपण असे वागत असाल तर याद राखा. सरकार आमचंच येईल. जनहिताच्या कामासाठी तुम्ही आचारसंहितेची वाट पाहणार असाल तर योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना समज द्यायला हवी, असेही मुनगंटीवार यांनी सूचविले.

Sudhir Mungantiwar
Ajit Pawar : अजितदादा, आता तुमचे देव ईडी, सीबीआय, मोदी अन्‌ शाह असतील; शरद पवारांच्या नेत्याची जहरी टीका

दरम्यान, जनहिताच्या सरकारच्या कामात खोडा घालणारे अधिकारी कोण आहेत, अशी चर्चा आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार का मेहेरबान आहे, असाही सवाल आता विचारला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सरकार पातळीवरून समज दिली जाणार का?, हा खरा सवाल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com